ब्रेकिंगमंत्रालय

Breaking: राज्यात उद्या २२ एप्रिल च्या रात्री ८ वा. पासून कडक लॉकडाऊन चे आदेश जारी

सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद

मुंबई,दि. २१:राज्यातील वाढत्या कोरोना प्रकोपाला पायबंद घालण्यासाठी आज राज्य शासनाने कडक लॉकडाऊन चे नवीन निर्बंध जारी केले आहेत.त्यानुसार
२२ एप्रिल म्हणजेच उद्या रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सध्याची ५० % उपस्थिती घटवून ती केवळ १५ % करण्यात आली आहे,मात्र यातून केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील

खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हर आणि ईतर प्रवासी क्षमते च्या ५०% प्रवाशांना परवानगी परवानगी असेल.
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा.

उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू राहतील

शासकीय आदेशाकरीता खालील लिंक वर क्लिक करा

Break The Chain order dtd. 21st April, 2021

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!