महाराष्ट्रमुंबई

फडणवीसांची सपकाळां विषयी ‘नया है वह’ प्रतिक्रीया हिंदी सक्ती मानसिकतेतून’…! – गोपाळ तिवारी

मुंबई – मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदीचा प्रभाव किती खोलवर  पोहचला आहे हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे आरोपां प्रती, पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर, फडणवीसांनी अनाहुत पणे दिलेली ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे टिकात्मक प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धन सपकाळ हे महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील विनोबा भावें आदींचे सत्य, अहिंसा व निर्भयतेचे संस्कार लाभलेले नेते आहेत.. साधी राहणी, ऊच्च विचारसरणी व नैतिक चारीत्र्याचे अधिष्ठान लाभलेले व सत्याची कास धरणारे नेते आहेत.

हर्षवर्धन सपकाळांचे प्रती बोलण्यापुर्वी, भाजपच्या ‘नवीन अध्यक्षां’च्या चारीत्र्याची माहीती स्वतः कडे गृह खाते असल्याने फडणवीसांकडे निश्चितपणे असेल मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, स्थानीय संस्था निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर भाजपला गुन्हेगारी कृत्या बाबत वादातीत अध्यक्ष नेमण्याची वेळ का आली यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भाजपच्या ‘नव्या प्रदेशाध्यक्षाचे’ काही गंभीर प्रकरण पुढे आल्यास.. ‘नया है वह’ सांगुन सुटका करण्याची आपणावर वेळ येऊ नये, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!