महाराष्ट्रकोंकणक्राइम

गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक; पाचवीत ल्या मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने ५ वीत शिकणाऱ्या  विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने घरी कुणी नसल्याचा फायदा उठवत त्याने हा अत्याचार केला. गुरू-शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जाते. मात्र, या नात्याला किशोर येलवे या शिक्षकाने कलंक लावलाय. किशोर येलवे (वय वर्ष ४६)हा दाभोलजवळाच्या आगरवागायनी या ठिकाणी राहत असून दाभोळमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतो.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दाभोळमधील भंडारवाडा या ठिकाणी ४ ते ५ च्या दरम्यान घडली. नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली असताना शाळेतील शिक्षकानेच या मुलीला विचारलं, ‘तुला न्यायला कोणी नाही का आलं? मुलीने नाही सांगताच मी तुला घरी सोडतो म्हणून आपल्या बाईकने किशोर येलवेने या १० वर्षीय मुलीला बाईकने घरी सोडण्यास गेला. यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नसल्याने किशोर येलवे हा देखील त्या मुलीच्या मागोमाग घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाहीय. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून त्यांनी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला आहे. हा नराधमाने मुली समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. झालेला प्रकार कोणालाही सांगू नको अशीं धमकी या मुलीलता दिली. शिक्षकाने तिथून पळ काढला मात्र झालेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली. तिने सर्वकाही शेजारी असलेल्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर हा सर्व प्रकार आई आणि वडिलांनासांगितला. हा शिक्षक दुसऱ्यांदा या मुलीला सोडण्यासाठी आलेला होता, अशी माहिती पुढे आली आहे. याआधी देखील हा शिक्षक या मुलीला सोडण्यासाठी घरी आला होता. पुढे पीडितेच्या पालकांनी दाभोळ पोलीस स्थानक गाठत शिक्षकावितोधात तक्रार दाखल केली. दाभोळ पोलिसांनी शिक्षक किशोर येतवेला अटक केली असून पॉस्को कायद्याचे कलम 8/10 आणि बीएनएस ७४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीषक अमोल गोरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!