कोकण हा केवळ निसर्गसौंदर्याचा नव्हे, तर अनेक रोजगाराच्या संधींनी बहरलेला विकासाचा हॉटस्पॉट – मंत्री उदय सामंत

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित ग्लोबल कोकण परिषद – कोकण व्हिजन २०३० या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. कोकण हा केवळ निसर्गसौंदर्याचा नव्हे तर ओद्योगिक, संरक्षण, वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनी बहरलेला विकासाचा हॉटस्पॉट बनत आहे. आपण सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे कोकण हे सर्वांगसुंदर आणि सक्षम बनवायचं असे यावेळी उदय सामंत ह्यांनी सांगितले.
देशात सर्वात मोठ बंदर कोकणात होणार आहे. दिघी पोर्ट उद्योगिक हब बनणार आहे. या ठिकाणी रेल्वे, एयरपोर्ट, महामार्ग, मोठ्या प्रमाणात दळण-वळणासाठी जाळे तयार करण्यात येणार आहे. तळकोकणात देखील लोक कला प्रोजेक्ट सुरू झाला आहे.
या वेळी उदय सामंत ह्यांनी सांगितले की, रत्नागिरीत उभारली जाणारी जगातील सर्वात मोठी डिफेन्स सिटी देशासाठी आवश्यक असलेली वेपन्स याच ठिकाणी तयार होणार असून रत्नागिरीकरांसाठी अभिमानाची आणि गोरवशाली बाब आहे. आता देशाच्या सुरक्षेकरिता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात वेपन्स तयार होणार आहेत. यामुळे ८,००० नवीन रोजगार उपलब्ध होणार! तसेच सेमिकंडक्टर प्रोजेक्टमधून २०,००० रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं सांगितले.
यासोबतच फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढणार असल्याचे आश्वासन उदय सामंत ह्यांनी दिले.