कोंकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावेच लागेल-पालकमंत्री उदय सामंत
(संग्रहित छायाचित्र)
सिंधुदुर्ग दि.२५:सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुंबईकर चाकरमानी असो किंवा इतर शहरांतून आपल्या गावात येणारा माणूस असो, प्रत्येकाला १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावेच लागेल, अशा व्यक्तीच्या हातावर शिक्का मारण्यात येईल. ही व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
या शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची यापुढे ‘ रॅपिड अँटिजेंन टेस्ट ‘ केली जाणार आहे तसेच जिल्ह्यात नाहक फिरणाऱ्या प्रत्येकाची सुद्धा अशीच ‘टेस्ट ‘ केली जाणार आहे.शनिवारी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.