महाराष्ट्रमुंबई
‘लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग’ विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

मुंबई : महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने असल्याने या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असल्याचे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
पन्नास खोके एकदम ओके..
चड्डी बनियन गँग हाय हाय..
महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो..
दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.