महाराष्ट्रमुंबईवाहतूक

बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा परिवहन विभागाकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत . त्या अनुषंगाने तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ नुसार, कोणत्याही प्रवासी वाहतूक सेवेच्या संचालनासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही ॲप कंपन्या व चालक हे नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO), मुंबईच्या विशेष पथकांनी २० युनिट्समार्फत एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. सदर मोहिमेमध्ये एकूण १२३ बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील ७८ बाईक टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध ॲप ऑपरेटरविरोधातही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!