ब्रेकिंग

गुड न्यूज:मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ३० एप्रिलपासून ओसरणार..

मुंबई,दि.२७:मुंबईसह राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट नोंदविण्यात आली. मुंबईत सोमवारी केवळ ३,८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्या ५० हजाराच्या खाली गेली. काल राज्यात ४८,७०० नव्या रुग्णांची नोंद झाली

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास नोंदवण्यात येत होती, काल ती ५० हजारांच्या आत नोंदली गेली. राज्यात दिवसभरात ५२४ जणांचा
मृत्यू झाला. रविवारी चाचण्यांची संख्या तुलनेत कमी असल्याने
रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविण्यात आल्याचे मानले जाते. काल दिवसभरात ७१,७३६ रुग्ण करोनामुक्त झाले.गेल्या सहा दिवसांत एकूण ४ लाख ४२ हजार रुग्ण करोनामुक्त झाले असून, ही आकडेवारी दिलासादायक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

३० एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला होणार सुरुवात

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे ३० एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!