उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित २०२४ गणेश सजावट स्पर्धेच्या विजेत्यांचा आमदार सुनील प्रभूंनी केला सत्कार

दिंडोशी, मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, आमदार व विभागप्रमुख सुनिल प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी विधानसभा क्षेत्र अंतर्गत २०२४ सार्वजनिक व घरगुती गणेश सजावट स्पर्धांचे पारितोषिक वितरण पारेखनगर सभागृहात संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये १०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व ७० घरगुती गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सार्वजनिक गणेशोत्सव विजेते:
प्रथम क्रमांक – नागरी निवारा महासंघ,
द्वितीय क्रमांक – वायशेतपाडा गणेशोत्सव मंडळ,
तृतीय क्रमांक – श्रीकृष्ण गृहनिर्माण संस्था
घरगुती गणेश सजावट विजेते:
प्रथम क्रमांक – आठ स्पर्धक,
द्वितीय क्रमांक – आठ स्पर्धक,
तृतीय क्रमांक – आठ स्पर्धक एकूण २४ स्पर्धक
(नोंद: विजेत्यांची संपूर्ण नावे लवकरच जाहीर करण्यात येतील) सार्वजनिक व घरगुती विभागात एकूण २४ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विजेत्यांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे मा. सुनिल प्रभु (शिवसेना नेते व आमदार), शिवसेना नउपनेते, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभागसंघटीका शालिनी सावंत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रशांत कदम (विभागसंघटक), रिना सुर्वे, आशा केणी (विधानसभा समन्वयक), वैभवी पाटील, माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, भाई परब, प्रदीप निकम, सुनिल गुजर, ऋचिता आरोस्कर, सानिका शिरगावकर, वृंदा पालेकर, विद्या गावडे तसेच दिंडोशी विधानसभेतील सर्व शाखाप्रमुख व शाखासंघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला व परिसरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्तांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.