क्राइम
येमेनमधील केरळच्या नर्सला मोठा दिलासा; निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द

केरळ : येमेनमधील एका खून प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नागरिक निमिषा प्रिया हिला जीवनदान मिळाले आहे. अबू बकर मुसलयार इंडियन ग्रँड मुफ्ती आणि ऑल इंडिया जमियतुल उलेमाच्या कार्यालयाने सांगितले की, निमिषा प्रिया हिची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. भारत सरकारसाठी हा एक मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. यापूर्वी येमेनच्या हुथी सरकारने निमिषाच्या फाशीची शिक्षा स्थगित केली होती. सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, आधीच तात्पुरती स्थगित केलेली फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.