महाराष्ट्रनवी दिल्ली
नवी दिल्ली मध्ये निवडणूक आयोगासोबत शिवसेना शिष्टमंडळाची बैठक

नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या आयोग सभागृह, निर्वाचन सदन, अशोक रोड येथे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीला महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.