महाराष्ट्रमुंबई

विधवा पेन्शन योजनेत वाढ करून रुपये १,५०० वरून रुपये ५००० करा – खासदार रविंद्र वायकर

मुंबई : राज्यातील असंख्य दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनाच्या वार्षिक उत्तपन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी तसेच मासिक पेन्शनची रक्कम रुपये १,५०० वरून रुपये ५,००० करण्यात यावी अशी मागणी, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सचिव यांच्याकडे केली आहे. 
हि योजना महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. हि योजना राज्यातील दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्याचा एकमेव आशेचा किरण आहे. परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. याचे कारण तहसीलदार यांच्याकडून त्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा रुपये २१,००० इतका लागत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत २१,००० म्हणजे मार्सिक १,७५० वेतन हे सामन्यातील सामान्य परिवार इतक्या वेतनामध्ये परिवाराचे पालन पोषण करून शकत नाही, मुंबई मध्ये एखादी सामान्य घरकाम करणारी महिला हि मासिक ८,००० ते १०,००० इतके वेतन मिळवते. त्यामुळे सदर वार्षिक उत्त्पन्न २१,००० च्या नियमावलीत बदल करून वार्षिक वेतन १,००,००० च्या आत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विधवा महिलांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच मुंबई महापालिकेद्वारा विधवा महिलेस पेन्शन देण्याची सुविधा करण्यात आल्यास महाराष्ट्रातील कित्येक महिलांना या योजनीचा लाभ घेणे शक्य होणार आहे, असे खासदार वायकर यांनी मंत्री तटकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच नियमावलीत काही बदलहि त्यांनी सुचवले आहेत. 
यात अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करावी. उत्पन्न व इतर अटींमध्ये लवचिकता ठेवून गरजूंना न्याय द्यावा, रुपये १,५०० असलेली पेन्शन रक्कम सध्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रुपये ५,००० प्रती महिना करण्यात यावी. या सूचनांचा सहानभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे महिला व बालविकास मंत्री तसेच सचिव यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!