महाराष्ट्रमुंबई

‘सफर सह्यदुर्गांची’ संस्थेच्या वतीने किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : “सफर सह्यदुर्गांची” या संस्थेच्या वतीने शहराजवळील किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम ३ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली. किल्ले रत्नदुर्गवर येणाऱ्या पर्यटकांची तसेच नेहमीच येणाऱ्या स्थानिक नागरिकांचीही संख्या मोठी आहे. मात्र येणाऱ्या नागरिकांकडून किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा सर्वत्र टाकलेला दिसून येतो.

प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे, कागद आदी कचरा सर्वत्र साचलेला दिसतो. ही बाब लक्षात घेऊन रविवारी सकाळी आठ वाजता “किल्ले रत्नदुर्ग” येथे “सफर सह्यदुर्गांची” संस्थेने प्लास्टिकमुक्त संवर्धन मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेचा शुभारंभ जिजाऊ संस्था रत्नागिरीचे जिल्हाअध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, फणसवळे गावचे सरपंच निलेश लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या मोहिमेत मयूर भितळे, शुभम आग्रे, सौरव बळकटे, सुरज खोचाडे, अक्षय भोसले, ओंकार सावंतदेसाई, खुशी गोताड, तेजस खापरे, दर्शन शेळके, सेजल मेस्त्री, अक्षय घाग, नयन कदम, रश्मी जाधव संस्थेच्या सदस्यांनी सहभागी होत ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!