निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला मिरच्या का झोंबतात ? – काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी मतचोरीची पोलखोल केली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतका राग यायचा कारण काय होते की त्यांनी असभ्य भाषेचा वापर करत टीका केली ? याचा एकच अर्थ जनतेला समजतो तो म्हणजे ही “मतचोरी” संगनमताने केली गेली का ? लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग आणि भाजपने मिळून केला का ? राहुलजी गांधी हे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, निवडणूक आयोगाचा बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते इतके धावपळ का करत आहे ? निवडणूक आयोग स्वतःचा बचाव करू शकत नाही का ? राहुलजी गांधी विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की “कुंपणच शेत खात आहे” राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, त्याचं स्पष्टीकरण आयोगाने जनतेला दिलं पाहिजे. निवडणूक आयोगाला भाजपच्या क्लिनचीटची गरज इतकी भासते का ? हा राज्यासह देशातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.