कोंकण
आगमनापूर्वीच राजापूरकरांना गणपतीबाप्पा पावला….

राजापूर : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असताना व दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो चाकरमान्यांचे आगमन होत असताना कोकण रेल्वेने राजापूर वासियांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अनेक सुपरफास्ट गाड्यांची अनेक वर्षांची राजापूरवासियांची मागणी राहिलेली असताना येत्या पंधरा ऑगस्टपासून नेत्रावती एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. यामुळे आगमनापूर्वीच गणपतीबाप्पा पावल्याची भावना प्रवाशांत आहे.
आतापर्यंत अनेक महत्वाच्या गाड्यांना थांबा नसलेल्या राजापूररोड स्थानकात लांब पल्ल्याच्या नेत्रावती एक्सप्रेसला (१६३४५/१६३४६) प्रायोगिक तत्वावर थांबा आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार.