महाराष्ट्रमुंबई
भागीजीशेठ कीर यांच्या मालमत्तेसंदर्भात मंगळवारी बैठक; भंडारी समाजाचे नेते रमेश कीर यांची मध्यस्थी

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या ताब्यासाठी रत्नागिरीकर आणि भागोजीशेठ यांच्या वंशजांनी स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. हे प्रकरण ‘भामभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ’ यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्या २४ फेब्रुवारी १९४४ रोजीच्या निधनानंतर त्यांच्या स्वसंपादित मालमत्तेचा ताबा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसीव्हरने घेतला होता. यावर २००४ साली निकाल लागला आणि दाव्यातील सर्व मालमत्ता वारसांना वाटप करून ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही काही मालमत्ता अजूनही वारसांना मिळालेली नाही. या विरोधात हे उपोषण छेडण्यात आले होते.