मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचे थैमान; पुढील २४ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई: काल रात्री पासून मुंबई सह कोकण आणि महाराष्ट्राला झोडून काढणाऱ्या पावसाने नागरिकांची अक्षरशः दैना उडाली आहे.मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या 48 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन हीच बाब लक्षात घेताना मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयाना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.