आमदार सुनील प्रभू यांच्या तर्फे गणेश भक्तांना कोकणात जाण्यासाठी खास बसेस चे आयोजन

महाराष्ट्र: आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी कोकणातील चाकरमानी बहुतेक वेळा गावची वाट धरतो. रेल्वेचं न मिळणारा आरक्षण तसेच खाजगी बसचे गगनाला भिडलेले भाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गावी जाणे बऱ्याच वेळेला अशक्य होऊन जाते आणि याकरताच शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या माध्यमातून आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) दिंडोशी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सवलतीच्या दरात लक्झरी बस सोडण्यात आल्या. मागील तीन दिवसात दहा बस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांकरिता सोडण्यात आल्या. मालाड पूर्व रहेजा वसाहत येथून कोकणात जाणाऱ्या बस ना हिरवा झेंडा दाखवून गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना गणपती पूजा साहित्य देण्यात आले. तसेच अल्पोपहार डब्बा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत सर्व गाड्या निघाल्या. या उपक्रमामुळे सर्व चाकरमानांनी आमदार सुनील प्रभू यांचे आभार मानले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला देखील सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु यांच्या सह विधानसभा संघटक रिना सुर्वे, उपविभाग प्रमुख सुनिल गुजर, उपविभाग संघटक रुचिता आरोसकर, उपविभाग संघटक कृष्णा सुर्वे,शाखा प्रमुख अशोक राणे, युवासेना विभाग अधिकारी प्रशांत मानकर व इतर पदाधिकरी तसेच गणेशोत्सव करिता गावी जाणारे चाकरमानी उपस्थित होते. सवलतीच्या दरात बस सोडण्याकरिता सुशांत पांचाळ, सुशांत पावसकर यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले.