श्रीरंग संस्थेचा 375 व्या नाटकाचा शुभारंभ प्रयोगाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची हजेरी

रत्नागिरी: गेली २५ वर्ष नाट्य क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या श्रीरंग संस्थेच्या ३७५ व्या प्रयोगाला काल (३१ ऑगस्ट) राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.
श्रीरंग संस्थेचा रविवारी टिळक आळी गणेशोस्तव मंडळ रत्नागिरी येथे “यू आर ग्रेट पप्पा” हा प्रयोग होता. डॉ. उदय सामंत यांनी रविवारी रात्री शहरातील टिळक आळीच्या १०० व्या गणेशोत्सवात येऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्याचवेळेला याठिकाणी श्रीरंग संस्थेचा टिळक आळी गणेशोत्सव मंडळात २५ वा प्रयोग होता. या प्रयोगाच्या ठिकाणी डॉ. उदय सामंत यांनी येऊन श्रीरंग संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, बंटी कीर, नितीन लिमये, तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप भारतीय जनता पक्षाचे सचिन करमरकर, योगेश करमरकर, प्रशांत डिंगणकर, मंदार खेर, शशिकांत काळे, तसेच श्रीरंग संस्थेचे अध्यक्ष भाग्येश खरे, गोपाळ जोशी, पुरुषोत्तम केळकर, प्रतिभा केळकर, पल्लवी गोडसे, सतीश काळे, प्रकाश केळकर, सत्तु गुरव आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.