सिने-नाट्य(वस्त्रहरण फेम)अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांचा पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार

ठाणे – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,ज्युपिटर हॉस्पिटल व आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यात गोरगरीब,गरजू लोकांच्या लहान मुला मुलींचे २डी तपासणी व हृदयाच्या छिद्राचे ऑपरेशन करण्यात आले.राज्यातील शेकडो गरजू लोकांच्या बच्चूंना या शिबिराचा लाभ मिळाल्याने,त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चिवटेसर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला,तर मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाचे मा.सभापती विलासकाका जोशी यांचे मी शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सिने-नाट्य कलाकार दिगंबर नाईक यांच्या हस्ते माझा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, जलतारा प्रकल्पाचे जनक पुरुषोत्तम वायाळ,ज्युपिटर हॉस्पिटलचे प्रमुख अजय ठक्कर,मा.नगरसेविका सौ.पूजा वाघ,ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटेसर,मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत,ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल बुडजडे आदी रुग्णसेवक तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले बाल रुग्णांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.