महाराष्ट्र
कोकणवासियांना हाक : मुंबई गोवा महामार्गावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी थेट ‘वर्षा’वर धडक !.

मुंबई: कोकणवासीयांनी गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य दुःख सोसले…
हजारो जीव गेले, कित्येक संसार उद्धवस्त झाले, अपघातात लेकरं पोरकी झाली. या सर्व यातनांचा साक्षीदार असलेला महामार्गाचा महाराजा सुरक्षित आणि सुसह्य प्रवासयोग्य व्हावा म्हणून
उद्या, अनंत चतुर्दशी, ६ सप्टेंबर २०२५ या दिवशी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचून कोकणचा आक्रोश मांडणार आहेत. ही मिरवणूक ही केवळ विसर्जन मिरवणूक नाही,
तर कोकणवासियांच्या १७ वर्षांच्या वेदनेचा हुंकार आहे. चला, आपण सारे एकत्र येऊ…चला, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू… चला, महाराजांच्या या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊ, असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे करण्यात आले आहे.