रत्नागिरी बांबू परिषद : शेतकरी मेळावा संपन्न

रत्नागिरी: आज रत्नागिरी येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बांबू परिषद व शेतकरी मेळावा कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सावंत उपस्थित होते.
बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नाही तर उत्पन्ना वाढवण्या आणि उद्योग निर्माण करण्याचा क्रांतीकारी मार्ग आहे. येत्या १७ सप्टेंबरला महाराष्ट्राची पहिली “बांबू पॉलिसी” राज्य सरकारतर्फे जाहिर होत आहे, ही आनंदाची बाब आहे. योग्य नियोजनाने आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याची ताकद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे. बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, अगदी मेथेनॉल उत्पादनापर्यंत विविध उद्योग उभे राहू शकतात. विमानातील टर्मिनल बिल्डिंगमध्ये ५०% फर्निचर बांबूचे असणार आहे, हा कोकणातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण असेल, असे यावेळी मा. ना. उदयजी सावंत यांनी म्हटले.
ही परिषद म्हणजे फक्त चर्चा नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनवण्याचा संकल्प आज मा. ना. उदयजी सावंत यांनी शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत केला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि विशेषतः मोठ्या संख्येने हजेरी लावणाऱ्या शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो असेही मा. ना. उदयजी सावंत यांनी म्हटले.
याप्रसंगी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पाशाभाई पटेल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग व्यासपीठावरील सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.