सेवा पंधरवडा’ पेक्षा रत्नागिरीचा ‘नमो सेवा वर्ष’ राज्यात वेगळा पॅटर्न

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल १७ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काल या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करताना ‘सेवा पंधरवड्यापेक्षा नमो सेवा वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात साजरे करुन वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाला आवाहन केले. खरोखरच जिल्ह्यात वर्षभर साजरा होणारे ‘नमो सेवा वर्ष हे महाराष्ट्रासाठी ‘रत्नागिरीचा वेगळा टर्न ठरल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यभरात साजरा होणाऱ्या सेवा पंधरवड्यातील उपक्रम है जिल्हा प्रशासनाने मोहीम स्वरुपात युध्दपातवळीवर राबवून जनतेला लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात केले आहे.
दि. १७ ते २२ सप्टेंबर पाणंद रस्तेविषयक मोहीम शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे. ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिबप उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेत रस्त्याची मोजणी व सीमाकन करणे, २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमाची अंमलबजावणी व पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करणे. अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकुल करणे, आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करून त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे
२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या अंतर्गत सर्व कातकरी समाजासाठी तालुका निहाय आधार नोंदणी, जातीचे दाखले वितरण, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड वितरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा तेथे दाखला अथवा मंडळस्तरावर दाखले वितरण करणे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांची डीबीटी पूर्ण करणे तसेच नवीन लाभार्थी शोधणे व १००% पात्र लाभार्थी यांना लाभ देणे. ई पंचनामा पोर्टल (नैसर्गिक आपत्ती) योजनेतील सर्व लाभार्थी यांची डीबीटी पूर्ण करणे. अर्धन्यायिक प्रकरणांचा (मंडळ अधिकारी ते अप्पर जिल्हाधिकारी) निपटारा करण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करणे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर संत सेवालाल बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना- बंजारा/लमाण तांड्यासाठी ग्रामपंचायत स्थापन करणे. वस्तीना महसूल गावांचा दर्जा देणे, २८ ऑगस्ट २०२५ रोजी च्या शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना द्यावयाची ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध शासकीय योजनांचा लाभ देणे. सेवा पंधरवडा कालावधीत नागरिक शेतकरी व लाभार्थी यांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा सेवा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या पंधरवड्याचा शुभारंभ काल पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला सन्मान आणि आदर देण्याबाबत त्यांनी विशेष उल्लेखाने सांगितले. शिवाय, केवळ पंधरवड्यापुरती सेवा न देता सर्वसामान्यांसाठी पुढे नमो सेवा वर्ष राबवावे, असेही सुचविले. रत्नागिरी जिल्ह्याचा हा पेंटर्न राज्यपातळीवर निश्चितच प्रेरणादायी आणि वेगळा ठरणार आहे.
प्रशांत कुसुम आंनदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी