महाराष्ट्रमुंबई
महामंडळाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. चित्रनगरी परिसरातील बॉलिवूड थीम पार्कच्या सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. यावेळी वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, फिल्मसिटी डॅशबोर्ड उद्घाटन, एन.डी.स्टूडियो मोबाइल अपचे उद्घाटन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण, नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन आणि गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.