पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन अभियानच्या वतीने मदतीचा हात, शैक्षणिक साहित्य देणार

मुंबई : मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय अटक वही,एक पेन अभियानने घेतला आहे.येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.
समाजातील वंचित आर्थिक दुर्बल , आदीवासी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा उपक्रम एक वही,एक पेन अभियानांतर्गत राबविण्यात येतो. मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम मुंबई सह महाराष्ट्र भर चालविला जातो.
मागील आठवडय़ात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांची पिके,घरे गुरेढोरे ,तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या सोबतच येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्यांचेही मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी नागरीक यांच्यासह विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
मराठवाड्यातील या विद्यार्थ्यांचे आर्थिक विवंचनेमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महामानव प्रतिष्ठान मार्फत चालविण्यात येणा-या एक वही एक पेन अभियान अंतर्गत शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. प्रतिष्ठान कडे असलेले शैक्षणिक साहित्य आणि नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता दानशूर समाजसेवक व नागरिकांनीही या अभियानात शैक्षणिक साहित्याचे योगदान द्यावे . योगदान देण्यासाठी 9372343108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. जमा झालेले शैक्षणिक साहित्य लवकरच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.