महाराष्ट्रमुंबईराजकीय

“सोनं हे महिलांना शोभून दिसतं; पुरुषांनी बैलाला साखळ्या घालतात तसं घालून.”, अजित पवारांची फटकेबाजी !

पिंपरी- चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांची परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख आहे. अजित पवार जे नेहमीच स्पष्टपणे बोलतात. चाकण येथे सराफ दुकानाच्या उदघाटना प्रसंगी अजित पवारांनी सोन्याच्या दागिन्यावरून टोलेबाजी केली आहे. “सोन्याचे दागिने हे महिलांच्या अंगावर शोभून दिसतात. पुरुषांच्या अंगावर नाही. बैलाला साखळी घालतात तश्या सोन्याची साखळी घालून मिरवत जाऊ नका.” अशी मिश्किल टिपण्णी अजित पवारांनी पुरुषांवर केली आहे. अजित पवार हे चाकणमध्ये बोलत होते.

अजित पवार म्हणाले, गोल्डन मॅन म्हणून काहींची ओळख आहे. अनेक गोल्डन मॅनने सोन्याचे कपडे शिवले. हे आपण पाहिलेलं आहे. पुढे अजित पवार म्हणाले, पुरुष आणि तरुण मंडळींना सांगायचं आहे. सोन्याचे दागिने हे आई, पत्नी, बहीण आणि लाडक्या मुलींच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर शोभून दिसत नाही. पुरुषांनी अशा भानगडीत पडू नये. उगाचच त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा साखळ्या घालून मिरवू नका. अशी मिश्किल टिपण्णी अजित पवारांनी चाकणमध्ये भर कार्यक्रमात केली आहे. चाकण येथे अजित पवारांच्या हस्ते सराफ दुकानाच उदघाटन झालं. त्यानंतर छोट्याखानी झालेल्या भाषणात अजित पवारांनी फटकेबाजी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!