कोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय
आपले आयुष्य सुरक्षित तसेच चांगल्या वळणावर नेण्यासाठी मारुती कारशिवाय पर्याय नाही – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात ६३ टक्के कार मारूतीच्या आहेत. देशाचा विचार केला तर पन्नास टक्केपेक्षा जास्त कार मारुतीच्या आहेत. आज ज्या ‘व्हिक्टोरिस’ मॉडेलचे अनावरण झाले, तीदेखील अतिशय चांगली कार आहे. वेगवेगळी फिचर्स त्यामध्ये विकसित केलेली आहेत. आपले आयुष्य सुरक्षित तसेच चांगल्या वळणावर नेण्यासाठी मारुती कारशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. मारुती सुझुकीच्या नव्या ‘व्हिक्टोरिस’ कारचे अनावरण उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जागृत मोटर्सचे संचालक राजेंद्र जोशी, संचालिका रेश्मा जोशी, संचालक आदित्य जोशी, प्राची जोशी, लीला जोशी, बैंक ऑफ इंडियाचे विभागीय एजीएम नरेंद्र देवारे, अभिनेता सचिन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.