कोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय
शिवसेनेकडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी २२ मदतीचे ट्रक रवाना
जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्याचा समावेश

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागात मदत पाठवण्याला प्राधान्य दिले आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ट्रक रवाना केल्यानंतर काल नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांसाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठविण्यात आली. या मदत ताफ्यामध्ये एकूण २२ गाड्या असून त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्य तसेच अन्य आवश्यक साहित्य यांचा समावेश आहे. ही मदत नांदेड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली असून, तेथील स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर आणि बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या मार्फत ही मदत नांदेड येथील पुरग्रस्त नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.