कोंकणमहाराष्ट्रमुंबई

मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट

मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात करू शकाल दस्त नोंदणी

•क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : मुंबई व मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी (Adjudication of Document ) करू शकतील. ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली.

आता मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचेल. निर्णय प्रक्रिया व कार्यालयीन कामकाज जलद होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!