महाराष्ट्र

दाभोळ खाडीतील पर्यटनाला नवी झेप ! सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या हाऊसबोट सेवेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ.

दापोली : दाभोळ खाडी, ता. दापोली येथे सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या हाऊसबोट सेवेचा शुभारंभ राज्याचे उद्योग व
मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला.

कोकणातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत, कोकणातील समुद्रसफरीचा अनुभव आता अधिक आकर्षक आणि आधुनिक स्वरूपात पर्यटकांपर्यंत पोहोचणार आहे.
या प्रकल्पामुळे दाभोळ खाडीचे सौंदर्य नव्या उंचीवर जाईल, तसेच पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. राज्य शासनाच्या माध्यमातून अशा उपक्रमांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ देण्यासाठी आणि या व्यवसायाला उद्योगाचा दर्जादण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

कोकणातील नैसर्गिक सौंदर्य आणि लोकांच्या उर्जेमुळे हे क्षेत्र नक्कीच देशभरात ओळख निर्माण करेल, असा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!