मुंबई – गोवा वंदे भारत ट्रेन नियमित वेळापत्रकानुसार 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार..

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आता २२ ऑक्टोबर २०२५ पासून नियमित वेळापत्रकानुसार संपूर्ण आठवडाभर चालवली जाणार आहे. यापूर्वी पावसाळ्यात ही ट्रेन फक्त आठवड्यातील तीन दिवस धावायची, मात्र आता प्रवाशांना आठवडाभर सुविधा मिळेल.
कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन फक्त तीन दिवस धावली. पण आता ट्रेन शुक्रवार वगळता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी चालेल.
गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सकाळी ५:२५ वाजता रवाना होईल आणि त्या दिवशी दुपारी १:१० वाजता मडगाव, गोवा पोहोचेल. तर, गाडी क्रमांक २२२३० मडगाव-मुंबई वंदे भारत मडगावहून दुपारी २:४० वाजता सुटेल आणि रात्री १०:३० वाजता सीएसएमटी, मुंबई येथे पोहोचेल.