रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अडीच हजार शेतकऱ्यांची हानी..

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे नैसर्गिक आपत्ती २०२५-२६ च्या पीक नुकसान अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ३०७.४१ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले. अंदाजे ४६.४ लाख रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील एकूण २ हजार ५१७ शेतकरी बाधित झाले आहेत.
या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदतीची रक्कमही प्राप्त झाली आहे. जून २०२५ मध्ये आलेल्या नुकसानीसाठी १२.९६ लाख रुपये प्राप्त झालेले आहेत तर जुलै २०२५ मधील नुकसानीसाठी ०.९० लाख रुपये प्राप्त झाले.
आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ही मदत वाटप करून त्यांना या संकटासून सावरण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.






