धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल- मंत्री उदय सामंत

मुंबई: स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू”, महायुतीत मिठाचा खडा टाकणान्यांना बाजूला केले पाहिजे. मंत्री सामंत.
पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी महायुतीतमधील बड्या नेत्यांवर आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.यामुळे महायुतीत वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळेच त्यांची शिवसेनेतील हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत.
महायुतीत दंगा नको, असा कानमंत्र पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना दिला होता. मात्र, रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम असून पुणेकरांसाठी लढत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अशातच आता रवींद्र धंगेकरांनी एक पोस्ट एक्सवरून शेअर करत सूचक संदेश दिला आहे.
या पोस्टमधून त्यांनी तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..! अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान धंगेकरांची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे.
याशिवाय आणखी एक पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमधून माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोस्टमधून कोणाचे नाव न घेता ती व्यक्ती कोण आहे, हे फडणवीस साहेबांना माहित असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान अश्यातच, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यांनी आज पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर प्रकरण, महायुतीतील ऐक्य, तसेच विविध राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी सांगितले की, महायुतीच्या संदर्भात बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावण्यात आला आहे.
“आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना त्रास होणार नाही, पण स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, `महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेत त्यानुसारच निर्णय होतील. युतीचे निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महायुतीत मिठाचा खडा टाकणान्यांना मात्र बाजूला केले पाहिजे.”
“रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे. तसेच, “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे,” असे म्हणत उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष वनमंत्री गणेश नाईकांवर तोफ डागली आहे.






