अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्कार…

मुंबई: न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना “उत्कृष्ठ पोर्टल निर्मात्या” म्हणुन ” रापा” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते
आणि जेष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक किरण शांताराम आणि जेष्ठ चित्रपट तंत्र तज्ञ उज्ज्वल निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे येत्या शुक्रवारी प्रदान करण्यात येणार आहे.
सौ अलका भुजबळ यांना या पोर्टल च्या उत्कृष्ठ निर्मितीसाठी या पूर्वी सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार, माणुसकी गौरव पुरस्कार मिळाले आहेत.
रापा : थोडक्यात माहिती
आकाशवाणीने 1967 सालापासून व्यापारी सेवा सुरुवात केल्या. त्यामुळे रेडिओच्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी
“रापा” अर्थात “रेडिओ अॅडव्हर्टायझिंग प्रॅक्टिसेस असोसिएशन ऑफ इंडिया” ही संघटना स्थापन केली. पुढे 1974 साली दूरदर्शनने देखील व्यापारी सेवा सुरू केल्या. म्हणुन 1977 साली रेडिओ आणि दूरदर्शन उद्योगातील क्षेत्रातील लोक एकत्र आले आणि त्यांनी पूर्वीच्या संघटनेचे नाव बदलून ते “रेडिओ अँड टेलिव्हिजन अॅडव्हर्टायझिंग प्रॅक्टिसेस असोसिएशन ऑफ इंडिया” असे केले.
दरवर्षी “रापा” तर्फे रेडिओ, टीव्ही, फिल्म क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रद्य यांना दिले जाणारे पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचे मानले जातात.






