महाराष्ट्र

वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाची अभय योजना…

मुंबई: वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने अभय योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांच्या दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. त्यासाठी येथील १५० जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यातील सहा जणांनी ४८९६१ रुपयांचा थकीत कर भरला असून १४१८२ रुपयांचा दंड माफ व्हावा म्हणून अर्ज करण्यात आला आहे. या योजनेचा अनेकजण लाभ घेणार आहेत. अनेक कारणांमुळे शासनाच्या मालमत्ता कर थकवणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे. असे असताना दरवर्षी वसुली जास्त व्हावी यासाठी शासनस्तरावरून प्रशासनाला कायम सूचना दिल्या जातात. एवढेच नव्हे तर काही वर्षापासून वसुली करा अन्यथा निधी मिळणार नाही अशी भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे प्रशासनाला अनेक उपाय करून वसुली वाढवावी लागत आहे. यासाठी प्रसंगी कठोर पावलेही उचलावी लागत आहेत. त्यामुळे जरी सर्वत्र वसुलीचा टक्का वाढला असला तरी थकीतदारांची संख्या तितकीशी कमी झालेली दिसून येत नाही. त्यांचा थकीत कर वसूल व्हावा यासाठी शासनाने ३० एप्रिल रोजी थकित करावरील दंड माफ करणारी अभय योजना आणली असून तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने अभय योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांच्या दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. त्यासाठी येथील १५० जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यातील सहा जणांनी ४८९६१ रुपयांचा थकीत कर भरला असून १४१८२ रुपयांचा दंड माफ व्हावा म्हणून अर्ज करण्यात आला आहे. या योजनेचा अनेकजण लाभ घेणार आहेत. अनेक कारणांमुळे शासनाच्या मालमत्ता कर थकवणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे. असे असताना दरवर्षी वसुली जास्त व्हावी यासाठी शासनस्तरावरून प्रशासनाला कायम सूचना दिल्या जातात. एवढेच नव्हे तर काही वर्षापासून वसुली करा अन्यथा निधी मिळणार नाही अशी भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे प्रशासनाला अनेक उपाय करून वसुली वाढवावी लागत आहे. यासाठी प्रसंगी कठोर पावलेही उचलावी लागत आहेत. त्यामुळे जरी सर्वत्र वसुलीचा टक्का वाढला असला तरी थकीतदारांची संख्या तितकीशी कमी झालेली दिसून येत नाही. त्यांचा थकीत कर वसूल व्हावा यासाठी शासनाने ३० एप्रिल रोजी थकित करावरील दंड माफ करणारी अभय योजना आणली असून तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने अभय योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांच्या दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. त्यासाठी येथील १५० जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यातील सहा जणांनी ४८९६१ रुपयांचा थकीत कर भरला असून १४१८२ रुपयांचा दंड माफ व्हावा म्हणून अर्ज करण्यात आला आहे. या योजनेचा अनेकजण लाभ घेणार आहेत. अनेक कारणांमुळे शासनाच्या मालमत्ता कर थकवणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे. असे असताना दरवर्षी वसुली जास्त व्हावी यासाठी शासनस्तरावरून प्रशासनाला कायम सूचना दिल्या जातात. एवढेच नव्हे तर काही वर्षापासून वसुली करा अन्यथा निधी मिळणार नाही अशी भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे प्रशासनाला अनेक उपाय करून वसुली वाढवावी लागत आहे. यासाठी प्रसंगी कठोर पावलेही उचलावी लागत आहेत. त्यामुळे जरी सर्वत्र वसुलीचा टक्का वाढला असला तरी थकीतदारांची संख्या तितकीशी कमी झालेली दिसून येत नाही. त्यांचा थकीत कर वसूल व्हावा यासाठी शासनाने ३० एप्रिल रोजी थकित करावरील दंड माफ करणारी अभय योजना आणली असून तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!