महाराष्ट्र

जर तसं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यात संबंध तोडू – नारायण राणे भडकले..

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर तळकोकणात ठाकरे आणि शिंद सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिंदे सेनने ठाकरेंचा हात धरणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. ठाकरेंच्या पक्षातून शिंदे सेनेत गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी सगळे एकत्र येणार असल्याचं म्हणत या चर्चेला एकप्रकारे दुजोराच दिलेला. अशातच यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जर तसं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यात संबंध तोडू, मी राजन तेली याला कुठलाही नेता आणि पदाधिकारी मानत नाही, राजन तेली आणि विशाल परब या दोन माणसांचा भाजपसोबत संबंध मानत नाही. कुठल्याही म्हणण्याला मी विरोध करेल. विशाल परब याने भाजपवर टीका केलीये, तो भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. फक्त मतदारसंघ नाहीतर जिल्ह्यात युती व्हावी, असं नारायण राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास युती करण्याचं ठरलेलं आहे. मला वाटतं युती व्हावी, दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. युतीने ८० टक्के पेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात आणि युती झाली तर घेतील असा माझा विश्वास आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटूंबात अंतर्गद वाद होऊ देणार नाही. आमच्या राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावलं होतं आणि त्यांचीही इच्छा आहे की युती व्हावी. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करतायेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली, मग इथे आता कसं काय झालं? पालकमंत्री आणि चव्हाणांनी बैठक घेऊन आमदार आणि खासदारांची काय इच्छा आहे पाहावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!