विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे असल्याचे आम्हाला अभिमान ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट चे समाज जोडण्याचे काम चांगले आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जगाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणदायी आहेत.जगाला मानवतेचा विश्र्वशांती चा विचार भगवान बुद्धांनी दिला आहे. शांततेशिवाय विकास घडू शकत नाही.विश्वशांतीचा विचार सांगणारे बुद्धतत्त्वज्ञान मूळ भारताचे आहे.जगाला समता बंधुता अहिंसा विश्र्वशांती हा मूळ विचार भगवान बुद्धांनी सर्वप्रथम जगला दिला याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
चेंबूर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये 36 व्या आंतरराष्ट्रीय सी आय एफ परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.त्यावेळी ना. रामदास आठवले बोलत होते.
यावेळी राज्यपालांचे सचिव आय ए एस अधिकारी प्रशांत नारनवरे; प्रा.एलिझाबेथ फिशबाचर; प्रा. बद्रु तिवारी; प्रा.विरोचन रावते; प्रा.हेलन जोसेफ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.





