मालाड मध्ये आलेले आदित्य ठाकरे भातखळकरांना दिसत नाहीत हे संघटन कमजोर झाल्याचे लक्षण ! आनंद दुबे
मुंबई,दि.२४: भारतीय जनता पार्टीचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर म्हणतात की उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना दाखवा आणि व्हॅकसिन घेवून जा.. कालच आदित्य ठाकरे मलाड येथे कोविड सेंटरची पाहणी करण्याकरिता आले होते, हे भातखळकरांना दिसले नाहीत म्हणजे हे तर भाजप संघटन कमजोर झाल्याचे लक्षण आहे असा टोला शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे सतत जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. कोविड सेंटरच्या/हॉस्पिटल च्या माध्यमातून तसेच ऑक्सिजनच्या माध्यमातून असो अथवा व्हेंटीलेटर, पुरवणे या सारखी कामे ते सतत करत असतात.
पण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना हे सर्व नाही दिसत.
फक्त आणि फक्त राजकारण करणे हेच यांना माहित आहे. आपल्याला कसे राजकारण करता येईल , आपण कसे चर्चांमध्ये येऊ ? कसे शिवसेना व महाविकास आघाडीचे नाव खराब होईल हेच यांचे काम असते. आपल्याला राजकारण करायला खूप मज्जा येत असेल पण आम्हाला असलं राजकारण करायचं नाही..
आमचे आदित्यजी ठाकरे जिकडे जिकडे गरज आहे तेथे सतत ते लक्षपूर्वक आपली कामगीरी पार पाडत आहेत , लोकांची मदत करत आहेत. तुम्ही फक्त राजकारण करत रहा जनता आपल्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. अशा शब्दात आनंद दुबे यांनी भातखळकर यांना सुनावले आहे





