ब्रेकिंग
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट, दहा जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली:राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये आज सायंकाळी 6.52 वाजता मोठा स्फोट झाला आहे. आय 20 या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या.
कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या काही कारला आग लागलेली आहे. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी कारमध्ये हा स्फोट झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मात्र मुंबई पुण्यासह देशातील सर्व महत्वाच्या शहरां मध्ये High alert जारी करण्यात आला आहे





