पंतप्रधान मोदींच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला खासदार वायकर यांचा हातभार….
निरोगी आयुष्याकडे पहिले पाऊल! खासदार वायकर यांच्या 'खासदार क्रीडा महोत्सवा'ची सुरुवात भव्य मॅरेथॉनने

मुंबई: सध्याच्या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी युवा पिढीसह सर्वसामान्य जनतेला निरोगी आणि सुदृढ बनवण्याच्या उद्देशाने रविवार, ७ डिसेंबर रोजी एका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘खासदार क्रीडा महोत्सव-२०२५’ चा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि ठिकाण:
तारीख: रविवार, ७ डिसेंबर (२०२५)
वेळ: सकाळी ६ वाजता
प्रारंभ बिंदू: आरे चेक नाका, गोरेगाव (पूर्व)
मार्ग: आरे चेक नाका ते बिरसा मुंडा चौक (राऊंड ट्रिप)
अंतर: २ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा तीन गटांत स्पर्धा होणार.
सहभाग: सुमारे २००० हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
विजेत्यांना बक्षिसे:
या मॅरेथॉनमध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र तसेच पदक देऊन सन्मानित केले जाईल. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या सर्व २००० हून अधिक स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी खासदार रवींद्र वायकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आरोग्यासाठी घेतलेल्या या भव्य उपक्रमात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




