राम मंदिर ट्रस्टवर विश्वास नसेल तर शिवसेनेनं 1 कोटी रुपयांचं दान वापस घ्यावे -आचार्य तुषार भोसले

मुंबई : अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. यावर महाराष्ट्र भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला सडतोड उत्तर दिले आहे. पडखरपणे बोलताना आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेने दिलेले दान वापस घेण्यास सांगितलं आहे.
अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.