कोंकणब्रेकिंग

कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेस चे इंजिन घसरले: वाहतुकीचा सहा तास खोळंबा!

अडकलेली राजधानी एक्सप्रेस अखेर मार्गस्थ..

रत्नागिरी:कोकण रेल्वे मार्गावर उक्षी टनेल परिसरात घसरलेले रेल्वे इंजिन सहा तासांनंतर रूळावर  आणण्यात  रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे अडकलेली राजधानी एक्सप्रेस अखेर रत्नागिरीकडे मार्गस्थ झाली आहे.

कोकण रेल्वे च्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेस च्या इंजिन चे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वहातुक थांबली होती.ही घटना आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.

हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ही ट्रेन धावत होती. या घटने नंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तात्काळ रवाना झाली आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले.व अखेर  सहा तासात वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे ला यश मिळाले आहे दरम्यान यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे देखील मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!