LIC च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा, महिन्याला तब्बल 45 हजारापर्यंत कमवा!

मुंबई l अनेकजण घरभाड्यावर अवलंबून असतात. घर बांधून ते भाड्याने देणे आणि त्याच्या पैशातून रिटायर्टमेंटचं आयुष्य निवांत जगणे असं अनेकांचं सुरु असतं. पण काही वेळा घर बांधूनही त्याला भाडेकरुच न मिळाल्याने ते रिकामं राहतं. लॉकडाऊनमध्ये अनेकांना याचा प्रत्यय आला. मात्र LIC ने अशा घरमालकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेमुळे गुंतवणुकीच्या दुसऱ्याच महिन्यापासून तुम्हाला पेन्शन सुरु होते. LIC च्या या खास योजनेचं नाव जीवन अक्षय पॉलिसी आहे. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे, गुंतवणुकीच्या पुढच्याच महिन्यापासून रिटर्न मिळणं सुरु होतं. आयुष्यभर पेन्शन रुपात पैसे मिळणे सुरु होतं.
काय आहे योजना?
ही एक पेन्शन योजना आहे. यामध्ये 6 प्रकारे रिटर्न मिळू शकतात. पेन्शनशिवाय अन्य फायदेही या योजनेत मिळू शकतात. एक वर्ष किंवा एक महिना किंवा तीन महिने अशा पद्धतीने या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या पॉलिसीवर कर्ज घेता येत नाही. मात्र जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर वारसांना त्याचे लाभ मिळतात. शिवाय यामध्ये आयकरातूनही सूट मिळते.
या योजनेत कोण गुंतवणूक करु शकतात?
या योजनेत 30 वर्षांवरील कोणीही गुंतवणूक करु शकतात. कमीत कमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 1 लाखापासून पुढे कितीही रुपये तुम्ही गुंतवू शकता. जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला 61 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन आजीवन मिळते. वर्षाला किंवा महिन्याला अशी रक्कम तुम्हाला पेन्शनरुपी मिळू शकते.
भाड्याच्या घरापेक्षा फायदा कसा?
LIC च्या माहितीनुसार, जीवन अक्षय योजनेत जर एका घराच्या किंमतीची रक्कम गुंतवल्यास, भाड्याच्या रकमेपेक्षा पेन्शनरुपी मिळणारी रक्कम अधिक आहे. समजा 1 कोटी रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला जवळपास 43 हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन आजीवन असेल. महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम सुरक्षित तर असतेच, शिवाय 3 वर्षानंतर तुम्ही कधीही तुमची गुंतवलेली रक्कम काढू शकता.
दुसरीकडे जर 1 कोटीचं घर बांधलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 25 ते 35 हजारापर्यंत भाडे मिळू शकते. एरियानुसार भाडेदर वेगवेगळा असू शकतो. पण जीवन अक्षय योजनेत तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळेलच. या योजनेला एरिया किंवा लोकेशनचं बंधन नाही.