कोंकण
एस टी चालकाचे धाडस:रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असताना एसटी पाण्यात घुसवली..

रायगड:कोकणात ज्यावेळी अतिवृष्टी होते त्यावेळी अनेक पूल व रस्ते पाण्याखाली जातात त्यामुळे अशा पुलावरून वाहने नेणे हे धोकादायक असते सूचना करूनही त्याकडे अनेकवेळा वाहनचालक दुर्लक्ष करून स्वत बरोबर अन्य जणांचे प्राण धोक्यात आणतात.
रायगडमध्ये काल असाच एक प्रकार घडला. वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पुराचा रस्ता एसटीचालकाने धाडसाने पार केला. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अतिवृष्टी मुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. असे असताना एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केला.






