
मुंबई: काल शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीची दैना उडाली असून विविध रेल्वे स्थानकात पाणी भरल्याने आज पहाटेपासून मुंबई येथील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या स्थानकात अडकून पडल्या आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या. परिमाणी आज प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची प्रचंड गैससोय होत आहे.
मध्य रेल्वेच्या दादर, परेल, सायन, कुर्ला, भांडुप स्थानकात पाणी भरल्याने सिएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक बंद झाली. प्रवासाच्या सोयीसाठी ठाणे ते कल्याण लोकल धावत आहेत
हार्बर मार्गवर वडाळा, चुनाभट्टी, टिळक नगर, कुर्ला स्थानकात रेल्वे रुळावर पाणी आले आहे. दरम्यान सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी हळूहळू ओसरत असले तरीही हवामान खात्याने आज जोरदार पावसाचा इशारा दिल्या असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.