ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटल येथे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने.

ठाणे: १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्यदिना निमित्ताने तसेच आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटल येथे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ० ते १८ वयोगटातील मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ठाणे , पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या फक्त ५ जिल्ह्यांकरिता सदर शिबीर असेल.
रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी ज्युपिटर हॉस्पिटल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे ( पश्चिम ) येथे सकाळी १० वाजे पासून दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबीर असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे यांनी दिली.
.महत्त्वाची सूचना – पूर्व नोंदणीनुसारच प्रवेश, Admission only with prior Appointment
##( सर्व बालकांची एकाच दिवशी तपासणी शक्य नसल्याने शिबीर दिवशी पासून पुढील सलग 15 दिवस प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र वेळ देण्यात येईल)
शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी पालकांनी खालील वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.
संपर्क/ नाव नोंदणी at Jupitar Hospital
पिडियाट्रिक कॉरडीओलॉजिस्ट,
मो.९०८२२५४५१७
संपर्क/ नाव नोंदणी
श्री.माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
८९०७७७६००२
श्री.राम राऊत, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
८९०७७७६००४
श्री.अरविंद मांडवकर, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
८९०७७७६००६
संपर्क
मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
मो.८२७५९०३०३०
मो.९८५१२३१५१५
कार्या.०२२२५३२२५६७/२५
पत्ता :- वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे (पूर्व)
मुख्य कार्यालय :-
मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, ठाणे (पूर्व)वेळ – सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.
For more info Click –
www.shivsenamedicalhelpline.org
कार्यालय संपर्क – (०२२-२५३२२५६७/२५)