
(प्रातिनिधिक छायाचित्र)
सिंधुदुर्ग: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेली मान्यता केंद्रीय वैद्यकीय आयोगाकडून अवघ्या ४८ तासांच्या आत अचानक रद्द करण्यात आली आहे . दरम्यान प्रस्तावात असलेल्या त्रुटी काढून त्याच्या पूर्ततेसाठी आयोगाकडून तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
आधी मंजूर झालेल्या प्रस्तावात नंतर कशा त्रुटी निर्माण झाल्या, असा प्रश्न निर्माण झाला असून. उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घालून मंजूर झालेल्या या महाविद्यालयाचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर राज्यातील अन्य तीन मेडिकल कॉलेजला परवानगी दिली होती. परंतु सिंधुदुर्गला मिळाली नव्हती.