
(संग्रहित छायाचित्र)
सिंधुदुर्ग: वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पावर आज बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा २४ मिनिटाचा अलायन्स एअरच्या विमानाने सुरक्षित प्रवास करून ‘टेस्ट लँन्डिंग’ यशस्वी केले.
आता विमानतळ लोकार्पण सोहळा अवघ्या दोन दिवसावर येवुन ठेपला असल्याने तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा त्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमिवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने अवघ्या २४मिनिटाचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाफ विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.