गोरेगाव रेल्वे स्थानक रिंग रोडला जया सुवर्णा यांचे नाव!
पान टपरी चालक ते बॅंकेचे अध्यक्ष असा थक्क करणारा प्रवास

मुंबई: गोरेगाव पूर्व येथील रेल्वे स्थानक रिंग रोडला भारत को ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन दिवंगत जया सुवर्णा यांचे नाव देण्यात आले आहे. बिल्लावा समाजासह सर्व समाजासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी रिंग रोडला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जया सुवर्णा यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी, मुख्य प्रतोद शिवसेना विधिमंडळ पक्ष, आमदार सुनील प्रभू, स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष स्वप्नील टेंभवलकर नगरसेविका साधना माने, जया सुवर्णा यांचा मुलगा सूर्यकांत सुवर्णा, सुभाष सुवर्णा, दिनेश सुवर्णा, योगेश सुवर्णा, पत्नी, सूना, नातवंडे असा परिवार आदी उपस्थित होते.
दिवंगत जया सुवर्णा यांच्या जन्म १५ मे १९४६ रोजी राज्य कर्नाटक येथे झाला. त्यांचे वडिलांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. आई वडील नोकरी धंद्या निमित्ताने निमित्ताने मुंबई आले व जया सुवर्णा यांनी पुढील माध्यमिक शिक्षण मुंबई येथे घेतले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी घराला हातभार लावण्याकरिता शिक्षणा सोबतच पान टपरीवर काम करणे सुरु केले यानंतर एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरवात केली. कै. जया सुवर्णा यांनी बिल्लावा समाजाला वरच्या जातीकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक सहन न झाल्याने समाजाच्या जडणघडणीसाठी संघटना स्थापून काम सुरू केले कालांतराने, राष्ट्रीय बिलावा महामंडळाची स्थापना करून त्याचे मार्फत समाजाच्या न्याय हक्कासाठी संगठीत लढा उभारला इतकेच नके तर बिल्लावा समाजाच्या प्रगतीसाठी शाळा बांधल्या, समाज एकत्रित होण्यासाठी मंदिरे उभारली. इतकेच नव्हे तर समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत मिळावी स्थैर्य लाभावे या करता आर्थिक मदत दिली. तसेच समाजाकरिता सांताक्रूज पूर्व येथे बिल्लावा भवनाचे निर्माण केले. सद्य स्थितीला राष्ट्रीय बिल्लावा महामंडळाद्वारे सुमारे २७० बिल्लावा भवनाचे निर्माण झाले असून याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होत असल्याचे दिसत आहे . समाजासाठी करीत असलेले काम पाहून १९९० साली जया सुवर्णा यांची सर्वानुमते, फक्त पाच शाखा असलेल्या भारत कॉ . बँक च्या अध्यक्ष पदी निवड झाली. जया सुवर्णा यांनी आपली व्यावसायिक अनुभव व समाजातील पत वापरून ध्येय धोरणे आखली जेणे करूनअगदी अल्प वेळातच बँकची भरभराट होऊन आज घडीला १०६ पेक्षा जास्त शाखा आहेत. एक यशस्वी बँकर अशी ओळख निर्माण केलेल्या जया सुवर्णा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून २०१४ साली कर्नाटक भूषण या कर्नाटक राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.







