गोरेगाव मिररमुंबई
आ.सुनिल प्रभू यांच्या माध्यमातुन दिंडोशीकरांना मोफत युनिवर्सल पास वाटप

मुंबई : दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना शिवसेना आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनिल प्रभू यांच्या माध्यमातुन युनिवर्सल पास (स्मार्ट कार्ड) चे मोफत वाटप रविवारी आमदार सुनिल प्रभु यांच्या कुरार मधील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. या वेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, रीना सुर्वे, पुजा चौहान उपविभाग प्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, ऋचिता आरोसकर शाखाप्रमुख मनोहर राणे, विजय गावडे, कृतिका शिर्के उपस्थित होते.
युनिवर्सल पासचे मोफत स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी रोज सायंकाळी ६ ते रात्रौ ८.०० वाजे पर्यंत ओम कुराराबाद बिल्डिंग, तानाजी नगर, कुरार येथील आमदार सुनिल प्रभू यांच्या जनसंपर्क कार्यालय संपर्क साधावा अशी माहिती विधानसभा संघटक विष्णू सावंत आणि प्रशांत कदम यांनी दिली आहे.